महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथील संगणक विभागातील विध्यार्थांना संस्था स्तरावर आकाशवाणी चंद्रपूर येथे औदयोगिक भेट दिली,त्यामध्ये संगणक विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील विधार्थानि सहभाग नोंदविला होता.
औद्योगिक भेट (Industrial Visit) म्हणजे विद्यार्थ्यांना उद्योगांच्या कार्यपद्धती आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेली सहल किंवा दौरा असतो,त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचे वातावरण अनुभवता येते आणि ज्ञानामध्ये भर पडते.
आकाशवाणी केंद्राला भेट देत असताना त्यांना रेडिओ प्रसारणात तज्ञ अभियंता श्री.चंदू मोरे यांनी विध्यार्थाना सेटलाईट कॉम्युनिकेशन आणि रेडिओ फिक्सवेसीबद्दल तसेच ट्रान्समीटर महत्वाची माहिती दिली.तसेच देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणारी ’आकाशवाणी’ आपली लोकप्रियता टिकवून आहे.आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे.आकाशवाणीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील ९९.३७% लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोहोचते. तसेच आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्रे आहेत. तसेच एकंदर २४ भाषांमध्ये एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात.कसा शोध लागला इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा शोध आणि रेडिओ कम्युनिकेशनच्या विकासापूर्वी,अनेक वायरलेस टेलिग्राफ प्रणाली प्रस्तावित आणि चाचणी केल्या जात असून विध्यार्थाना मार्गदर्शन केलेआणि विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान आणि कौशल्ये मिळतात, ज्यामुळे ते अधिक सक्षम होतात.
तसेच संगणक विभागातील विभाग प्रमुख प्रा.सोनम रेवतकर,प्रा.राजेश्री पाटील,प्रा.किरण मोहुर्ले,प्रा.सरोज पाचभाई आणि विध्यार्थी उपस्थित होते.