महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक येथील इलेक्ट्रिकल विभागातील विध्यार्थांना आणि इलेट्रोनिक्स अँड टेलीकॅम्युनिकेशन विभागातील विध्यार्थी संस्था स्तरावर MIDC (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन)चंद्रपूर येथे औदयोगिक भेट दिली.
त्यामध्ये मान्यवर श्री.जयप्रकाश रेड्डी सर ,श्री.राया पोकडे सर यांनी विध्यार्थाना ट्रान्स्फार्मर ची रिपेरिंग आणि रिवायंन्डिंग करणे ,तसेच ट्रान्स्फार्मरचे ऑइल चेंज करणे आणि त्याला पूर्ण पने नवीन बनवुन कंपनीला किंवा ग्राहकांना सप्लाय करणे हे काम सुरु असते हे विध्यार्थांनि जाणून घेतले, तसेच ट्रान्सफॉर्मर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा वापर करून, ऊर्जा हस्तांतरित करण्यासाठी किंवा इलेक्ट्रोनिक सर्किट्समध्ये एका विशिष्ट तत्त्वासह बदलणारे विद्युतीय यंत्र होय ह्याबद्दल विध्यार्थाना माहिती दिली,विद्यार्थ्यांना उद्योगाचे काम, मशीन कशी काम करतात, कामगारांना किती वेळ लागतो, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, हे शिकण्यासाठी औद्योगिक भेट घेतल्या गेली.
इलेक्ट्रिकल विभागातील विध्यार्थांना आणि इलेट्रोनिक्स अँड टेलीकॅम्युनिकेशन विभागातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील विधार्थार्थी सहभागी झाले होते, तसेच उपप्राचार्य दीपक मस्के,इलेक्ट्रिकल विभागातील विभाग प्रमुख प्रा.अमित ठाकरे,इलेट्रोनिक्स अँड टेलीकॅम्युनिकेशन विभागातील विभाग प्रमुख प्रा.दीपक नागराळे,प्रा.धनश्री कोटकर,प्रा.मिथुन डे,प्रा.नेहा पाचभाई उपस्थित होते.