महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीकतर्फ विध्यार्थ्यांसाठी JCI तर्फ ओरियंट सेमिनार चे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये श्री.प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के, तसेच प्राध्यपकJFS CA श्री.प्रतीक सारडा, HGF सचिव ज्ञानेश्वर कांचरलवार, JC सचिव श्री.कुणाल वेगव, प्रा.मोजास,प्रा.जोगे सर आणि इतर प्रमुख मान्यवर मंचावर उपस्थित होते, सर्वप्रथम मान्यवरांचे पूष्पगुछ देऊन स्वागत केले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले.
प्राध्यपक JFS CA श्री.प्रतीक सारडा आणि प्रमुख मान्यवरांनी यांनी विध्यार्थाना JCI मध्ये सामील का व्हायचे ? तसेच नेतृत्व विकास ,व्यवसाय आणि नेटवर्किंग संधी ,वयक्तीक वाढ आणि कौशल्य वाढ ,समुदाय प्रभाव आणि सामाजिक जवाबदारी याबद्दल माहिती दिली.
तसेच विध्यार्थानशी संवाद साधत असताना ओरिएंटेशन म्हणजे एखादयाला किंवा होकायंत्राच्याबी बिंदूच्या किंवा इतर निर्दिष्ट स्थानाशी संबधित दिशा देणारी क्रिया होय, अशा प्रकारे विध्यार्थाना महत्वाच्या मुद्दयांवर चर्चा करून त्यावर प्रकाश टाकण्यात आले.
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.नितेश चव्हाण यांनी केले.तसेच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.