
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चंद्रपूर येथे मातृभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,या कार्यक्रमची सुरुवात दीपप्रज्वल करून करण्यात आले,त्यानंतर सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. पी. ए. गाडगे यांचे स्वागत सहाय्यक प्रा. आशिष देहरकर, प्रा. ए. आर. खुजे उपप्राचार्य आणि सहाय्यक प्रा. कल्याणी कडूकर, सहाय्यक प्रा. उज्जला सावरकर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाची सुरुवात बी. टेक. च्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर आणि सुमधुर मराठी भावगीतांनी केली.
आपल्या विस्तृत भाषणात डॉ. पी. ए. गाडगे सरांनी मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित केले. मातृभाषा ही आपल्या आत्म्याची भाषा आहे असे म्हटले – आपले विचार भावना आणि भावनांवर प्रक्रिया करतात. ही भाषा आपण आपल्या आईच्या गर्भात असल्यापासून शिकतो. जगभरातील शास्त्रज्ञांचे असे मत आहे की मुलांना योग्य शिक्षणासाठी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण दिले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे आणि शुद्ध स्वरूपात वाचन आणि लेखन करून ती जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
याप्रसंगी उपप्राचार्य ए.आर. खुजे सर यांनीही आपले विचार व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व भाषांचा आदर करण्याचे आवाहन केले परंतु त्यांच्या स्वतःच्या मातृभाषा शिकण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. विविध भारतीय भाषांमधील आपले महान साहित्य विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेख संचालन प्रथम वर्ष बी.टेक. यांनी केले. आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक नरेश गणवीर यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाले.