महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिवस उत्सहात साजरा करण्यात आला,संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर,प्रा.राजदा सिद्धकी,डॉ.बियाणी ,डॉ.गट्टूवार,डॉ.निशा,डॉ.रानदीवे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिवस उत्सहात साजरा करण्यात आला.
आंतराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या हक्काच्या चळवळीचे प्रतीक असून त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा दिवस पाळला जातो,सर्वत्र बदल घडवायच्या असेल तर शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,प्रशासकीय व आर्थिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना स्थान मिळाले पाहिजे असे प्रतिपादन केले.तसेच महिलांना त्यांच्या अधिकारावीषेय जागृत करणे गरजेचे असेही त्यांनी मार्गदर्शन केले,महिला दिनाविषयी बोलत असताना,महिलांचा सन्मान,आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जागतिक महिला दिन साजरा करतात,आज महिला स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात,मात्र पहिले असे नव्हते,पुर्वीच्या महिलांना शिक्षण,नौकरी आणि मतदान करण्याचा अधिकार नव्हता,आंतराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा जागतिक दिन म्हणून निश्चित करण्यात आला .
तसेच जागतिक महिला दिवसा निमित्य सर्व डॉ.महिलांचा,प्राध्यपकवर्ग आणि शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्याना पुष्पगुछ आणि उपहार देऊन गौरविण्यात आले.