महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती येथे १० च्या विध्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर ,डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य राजदा सिद्धकी, प्राचार्य डॉ.प्रीती साहू (आयुर्वेद मेडिकल कॉलजे अँड हॉस्पिटल ),प्राचार्य डॉ जगदीश गंपूरवार(डीफार्म), प्राचार्य प्रकाश पिंपळकर( आयटीआय) सर उपस्थित होते, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावर्षी दहावी च्या विध्यार्थ्यांसाठी आठवी आणि नववी वर्गातील विध्यार्थानी सामूहिक नुत्य,गायन,रॅमवॉक,एकपदरी नुत्य,कार्यक्रम सादर केले तसेच स्टुडन्ट ऑफ इयर अक्षरा मशकत्री,तसेच मिस मॅकरून प्रथा नैताम ,मिस्टर मॅकरून हर्षित शर्मा ह्या विध्यार्थाना मिळाला,तसेच विध्यार्थी आपले मनोगत व्यक्त्त करीत असताना मॅकरून स्टुडन्ट अकॅडमि स्कूल या वटवृक्षाच्या सावलीस आलेल्या एका छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे,माझ्या शिक्षकांनी फक्त अभ्यासातील विषयाशीच माझी मैत्री जमवली नाही तर जगात कसे वागायचे,कसे जगायचे,कुणाशी कसा बोलायचं हे देखील शिकवले,शिक्षकांनी आमच्या आज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा ,संस्कृतीचा लेप दिलेला आहे असे असे विचार मांडले.
श्री. पी.एस . आंबटकर विध्यार्थाना आव्हान करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते .स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे.म्हणून शिक्षणासोबत इतर क्षेत्रसुद्धा निवडावे, विद्यार्थ्यांचे मनोबल वाडऊन त्यांना मार्गदर्शन केले, तसेच ९५ % चा वर गुण प्राप्त केलेल्या विध्यार्थाना लॅपटॉप बक्षिसे मिळणार आहे, तसेच सर्व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.
या कार्यक्रमाला शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.