महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व IEDSSA अंतर्गत नागपूर विभागीय मुलीचे ऍथलेर्टिक स्पर्धा श्री.साई पॉलीटेक्नीक येथे आयोजित करण्यात आले होते, विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच जीवनातील खेळाचे महत्व लक्षात घेऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत चंद्रपूर ,नागपूर ,भंडारा,गोंदिया ,गडचिरोली या जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय पॉलीटेक्नीक व फार्मसी कॉलेजच्या विध्यार्थानी सहभाग नोंदविला होता,यास्पर्धेत १०० मीटर,२०० मीटर, ४०० मीटर रनिंग,उंच उडी,लांब उडी ,भाला फेक ,गोळा फेक व थाळी फेक, रिले आदी क्रीडा स्पर्धेचा समावेश आला होता.
या स्पर्धेत भाला फेक आणि उंच उडी स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थिनी लक्ष्मी भोयर मायनिंग द्वितीय वर्षातील हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या व्यतिरिक्त क्रीडा स्पर्धेत १०० मीटर रनिंग स्पर्धेत इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातील चेतना गोहणे उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आणि गोळा फेक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकाविला, ट्रिपल जम्प विनर श्रुती कार्लेकर सिव्हिल इंजिनीरिंग विभागातील आहे, तसेच लॉन्ग जम्प दिशा गेडाम इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग तृतीय वर्षातील, संघनक विभागातील स्नेहा नागुलवार ,इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग विभागातील श्रुती कार्लेकर, इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग तृतीय वर्षातील चेतना गोहणे व दिशा गेडाम ह्या विध्यार्थानी रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. विधार्थीनीच्या यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख,उपप्राचार्य श्री. दीपक मस्के, यांनी हार्दिक अभिनंदन केले.
क्रीडा प्रमुख प्रा. धनश्री कोटकर ,प्रा. कमलेश ठाकरे,टीम मॅनेजर प्रा. नॅन्सी राऊत महत्वाची भूमिका पार पाडली. या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत असून सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विध्यार्थांचे अभिनंदन केले.