महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी भद्रावती येथे विध्यार्थ्याची वार्षिक क्रीडा महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.हि स्पर्धा मॅकॅरून स्टुडन्ट अकॅडमि ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आली होती. हि क्रीडा स्पर्धा शारीरिक आरोग्य जपणे,अभ्यासा व्यतिरिक्त्त इतर खेळामध्ये सहभाग विध्यार्थानी घेण्याची सवय लागावी हा उद्धेश आहे.
क्रीडा महोत्सव मध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट , वॉलीबॉल, बास्केटबॉल,मीटर धावणे ,स्लो सायकलिंग, संगीत खुर्ची, लिंबू चमचा,विध्यार्थांसाठी विविध खेळा चा समावेश करण्यात आला होता.
त्याकरिता Mspm ग्रुप चे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन केले तसेच पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले, प्राचार्य राजदा सिद्धकी , प्रा.पिंपळकर सर तसेच शिक्षकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी सर्व विध्यार्थांचा उत्साह आणि मनोबल वाढवून खेळमय वातावरण निर्माण केले.
क्रीडा प्रमुख भोयर सर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली .