इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित विधार्थीनीचे टेबलटेनिस सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजच्या विधार्थीनीचे उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत विजयी ठरले व संस्थेचे नाव मोठे केले.हि स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, ता.विसापूर येथे बी.या.टी.बल्लारपूर यांनी आयोजित केली होती.या स्पर्धेतमध्ये नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली पॉलीटेक्नीक कॉलेज आणि फार्मसी संघानी भाग घेतला होता.
येथे विधार्थीनीच्या अनेक क्रीडा स्पर्धा ज्यात टेबल टेनिस,शतरंज,कॅरम,बॅटमिंटन,वॉलीबॉल,बास्केटबॉल,रनींग,इत्यादी स्पर्धेत जवळपास ३० ते ३५ संघानी भाग घेतला होता,तसेच टेबलटेनिस या स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विधार्थीनी ईलेट्रीकल विभागातील चेतना गोहणे, अपर्णा नंदुरकर, दिशा गेडाम, मायनींग विभागातील लक्ष्मी भोयर, नंदिनी अहिरकर या स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विधार्थीनीने विजेते ठरले, विजयी संघ यांचे चयन राज्य स्तरीय स्पर्धेत झाले आहे.
विधार्थीनीच्या यशाबद्धल अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य श्री.दीपक मस्के ,उपप्राचार्य श्री.जमीर शेख,रजिस्टार बिसन सर यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
तसेच क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे आणि प्रा.धनश्री कोटकर तसेच टीम प्रबांधक प्रा.प्रतीक दातार, प्रा.कणिशा यांनी महत्वाची भूमिका पार पाडली,सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व विधार्थांचे अभिनंदन केले.