महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक,मॅकरून स्टूडेंट अॅकेडमी , प्रायव्हेट आय.टी.आय., सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेज , सोमय्या डिप्लोमा इन फार्मसी कॉलेज यांचा संयुक्तरित्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य दीपक मस्के , उपप्राचार्य जमीर शेख सर , प्राचार्य डॉ.पद्मनाम गाडगे ,उपप्राचार्य अनिल खुजे, प्राचार्य राजकुमार , प्राचार्य अमित जोगी, प्राचार्य मोझेस दुर्गवाड  ,मंचावर उपस्थि होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर हयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, हया प्रसंगी सामुहिक फ्लॅग सेल्यूट, परेड, भाषण, देश भक्तीपर, गीत, नुत्य सादर केले.

                         संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर यांनी विध्यार्थाना मार्गदर्शन करित असतांना 26 जानेवारी हा गणराज्य दिन  म्हणून ओळखला जातो, भारताला ब्रिटीश राजवटी पासून 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले, यामागे भारताचा स्वातंत्र लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पध्दतीचा मोठा सहभाग आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली एक संमीती नेमली गेली, बरेच विचार विमर्श करून 26 जानेवारी रोजी संपूर्ण राष्ट्रासाठी संविधान लागू करण्यात आले, भारताची राज्यघटना या दिवशी अंमलात आली, भारतीय संविधान हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान आहे. या संविधानाने सर्व धर्मातील लोकांना समान दर्जा दिलेला आहे. या संविधानाने आपले हक्क आणि अधिकरांसाठी लढण्याची ताकद दिलेली आहे. आज आपण स्वतंत्र भारतात जीवन जगत आहोत, भारतीय संविधानाने दिलेली हि खूप अनमोल ताकद आहे. भारत हा खूप शक्तीशाली देश आहे. आज अखेर आपल्या देशाने अनेक संकटावर मात केली आहे. प्रजासत्ताक दिवस हा एक प्रकारे भारताचा राष्ट्रीय उत्सव आहे,म्हणून आपण साजरा करतो.

                           विध्यार्थानी 26 जानेवारी देशभक्तीपर भाषण दीले, गीते गायली, तसेच विध्यार्था, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी एकमेकांना गणराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, प्रजास्त्ताक दिन दरवर्षी मोठया उत्सहाने साजरा केल्या जातो.त्यामुळे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेम अधिक उजळून निघते.

                 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नौशाद सिध्दीकी यांनी केले.

Previous post MSPM ग्रुप तर्फ प्रजासत्ताक दिन साजरा
Next post सोमय्या पॉलीटेक्नीकच्या गर्ल्स टेबलटेनिस मध्ये मारली बाजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News