सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेजच्या विधार्थिनी क्रीतिका शुक्ला हिने ज़िल्हा स्तरीय मुक्केबाजी (बॉक्सिंग) स्पर्धेत मारली बाजी
सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजच विधार्थीनीचे क्रीतिका शुक्ला हिने मुक्केबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत संस्थेचे नाव मोठे केले, हि स्पर्धा ज़िल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर ,चंद्रपूर ज़िल्हा बॉक्सिंग संघटना व आनंद निकेतन ,आनंदवन वरोरा यांचा संयुक्त विद्यमाने दिनांक २५/०८/२०२४ ला आयोजित करण्यात आला होता,त्यामध्ये एक दिवसीय ज़िल्हा स्थरीय बॉक्ससिंग स्पर्धा बाबा आमटे यांचा आनंदवन येथे संपन्न झाली,या मध्ये एकूण ८० बॉक्ससिंग खेळाडुनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर व डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर यांच्या हस्ते विधार्थीनीला मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले ,क्रीतिका शुक्ला हिने ज़िल्हा स्तरीय मुक्केबाजी प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्धल अभिनंदन केले आणि विध्यार्थाना आव्हान करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते .स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे.म्हणून शिक्षणासोबत इतर क्षेत्रसुद्धा निवडावे.
हि स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती यांचे औचित्य साधून ह्या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले .हा दिवस १९२८, १९३२आणि १९३६ मध्ये भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे हॉकीपटू मेजर ध्यानचंद सिंग यांचा वाढदिवस आहे.या दिवशी विविध वयोगटातील खेळाळू खेळांमध्ये भाग घेतात.
विधार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस . आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.पी. ए.गाडगे, उपप्राचार्य श्री.जमीर शेख ,प्रा.श्री.अनिल खुजे, प्रा.सोनम रेवतकर ,प्रा.धनश्री कोटकर, प्रा.कमलेश ठाकरे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याना दिले.
तसेच क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे आणि प्रा.धनश्री कोटकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आणि नवी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या, त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत असून शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचाऱ्यांना अभिनंदन केले.