सोमय्या पॉलिटेक्नीक येथे १५ ऑगस्ट दिन उत्सहात साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलिटेक्नीक कॉलेज वडगाव येथे १५ ऑगस्ट दिवस साजरा करण्यात आला, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, प्रा.राजकुमार,प्रा.जोगे, प्रा.मस्के,प्रा.खुजे,रजिस्टर बिसन उपस्थित होते, सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरूवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस.आंबटकर हयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रीय गीत,फ्लॅग सेल्यूट घेण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांनी मार्गदर्शन करित असतांना १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र मिळाले, या दिवशी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे.
येणाऱ्या आजच्या सर्वच पिढीतल्या जनतेसाठी १५ ऑगस्ट हे वर्ष म्हणजे एक ऐतिहासिक असे वर्ष म्हणून ओळखण्यात येते आणि या महत्वपूर्ण अशा पवित्र दिवसाच्या आठवणी आपण दरवर्षी सुवर्ण दिवसाला १५ ऑगस्टला ” स्वातंत्र दिन ” म्हणून उत्सहात साजरा करतो . यामागे भारताचा स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी,स्वातंत्र्यवीरानी आपल्या प्राणाची आहुती दिली.
सर्व विधार्थानी डान्स,गायन ,भाषण सादर करण्यात आले. तसेच मान्यवरांनी देशावर असलेले प्रेम व्यक्त करीत भाषण दिली, सर्व धर्मातील लोकांना समान दर्जा दिलेला आहे. या संविधानाने आपले हक्क आणि अधिकरांसाठी लढण्याची ताकद दिलेली आहे. आज आपण स्वतंत्र भारतात जीवन जगत आहोत, भारतीय संविधानाने दिलेली हि खूप अनमोल ताकद आहे. भारत हा खूप शक्तीशाली देश आहे. आज अखेर आपल्या देशाने अनेक संकटावर मात केली आहे,लढा आणि महात्मा गांधी यांच्या अहिंसा पध्दतीचा मोठा सहभाग आहे. तसेच शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी एकमेकांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.