सोमय्या तंत्रनिकेतन येथे शिवाजी महाराज जयंती साजरी
” सहयांद्रिच्या कुशीतुन एक हिरा चमकला,
भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला,
हातात घेऊन तलवार शत्रुवर गरजला,
महाराष्ट्रात एक राजा होऊन गेला “
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर व्दारा संचालित सोमय्या तंत्रनिकेतन प येथे शिवजयंती मोठया आनंदात व उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हयांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली, हया कार्यक्रमाकरीता संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. पी .एस.. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टार श्री. राजेश बिसेन सर, उपस्थीत होते
मराठा सरदार शहाजीराजे भोसले व मातोश्री जिजाबाई यांचे पुत्र व हिंदवी स्वाराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज हयांचा जन्म झाला, त्या वेळी महाराष्ट्रात सर्वत्र निजामशाही,आदिलशाही व मुगलशाही अस्तित्वात होती.
शहाजी राजांनी शिवाजीच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. मातोश्री जिजाऊ साहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्वकांक्षा निर्माण केली व त्या ईच्छाशक्तीच्या आधारावर वयाच्या 15 व्या वर्षातच आपल्या सहकार्याच्या मदतीने तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, त्या नंतर त्यांनी साम-दाम-दंड-भेद याचा वापर करून कोंढाणा व पुरंदर सारखे मोठे किल्ले ताब्यात घेवून आपली ताकत वाढविली व दिनांक 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला व त्यंाची राजे छत्रपती म्हणून त्यांची ओळख झाली. या निमीत्याने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा शिवराई सोन्याच्या शिवराई घेत अशी नाणे सुरू केली, अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करूण त्यातून स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
शिस्तबध्द लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामथ्र्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले, भूगोल आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलढय शत्रूंचे मानोधर्य खच्ची करणारे नेमके हल्ले याचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले, आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोटया तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डगडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यात त्यांनी प्रोत्साहन दिले. सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म ते औरंगजेबाचा मृत्यू हया काळ 77 वर्षाच्या काळास इतिहासकार ”शिवकाल “ असे म्हणतात.
शिवाजी महाराज्यांच्या जीवनाविषयाी संबोधित असतांना ”छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणा-या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतिक होते, जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते,त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले,त्याच्यामागे राष्ट्रीयत्वाची पाश्र्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले.त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभूत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठयाचा राज्यविस्तार होतच राहिला.
हया कार्यक्रमाला उपस्थित असणारे संस्थेचे विभाग प्रमुख, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
” शिवरायांचे आठवावे रूप “
” शिवरायांचा आठवावा प्रताप “
” शिवरायांचा आठवावा साक्षेप “