
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्निक कॉलेज च्या वतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला.फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारी होळी हा सण भारतामध्ये साजरा होणारा रंगाचा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा होलिका उत्सव, होलिका दहन, शिमगा, धुलीवंदन व रंगपंचमी अशी नावे आहे. पॉलीटेक्निक होळी म्हणजे दरवर्षी पाण्याची बरसात आणि रंगाची उधळण असते. होळीला महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवद्य तसेच नारळ अर्पण करून मंत्रोचार करून होळी जाळून होळी उत्सव करण्यात येतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग पंचमी साजरी करतात ह्या दिवशी एकमेकाला रंग लावून रंगाची उधळण करणे,सर्वानी एकत्र येणे आणि बंधुभाव, एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहीले जाते.
होळीचा या पवित्र अग्निमध्ये निराशा,दारिद्रय,आळस यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,सुख,आरोग्य व शांती नांदो अशी मनोकामना करीत संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी शुभेच्छा दिल्या, संस्थेचे सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री. बिसेन सर यांची उपस्तित होते, आणि होळी सणबध्दल माहिती दिली.
हया कार्यक्रमाकरीता संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.