सोमय्या पाॅलिटेक्नीक चंद्रपूर येथे श्री.संताजी शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती कोवीड 19 चे भान ठेवून साध्या पध्दतीनी पार पाडली,याकरीता संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर, उपाध्यक्ष. पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख सर, रजिस्टार बिसन सर, उपस्थित होते. सुरूवातीला संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी पी.एस.आंबटकर यांनी श्री.संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्राब़द्यल मार्गदर्शन केले. प्रस्थापित अन्यायाविरूध्द संघर्ष करणा-या संत तुकाराम महाराजांचे पटशिष्य असलेले संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म चाकण,जि.पूणे येथे झाला. त्यांचे मुळ आडनांव सोनावणे असून जगनाडे या टोपन नावाने ते जास्त प्रसिध्द झाले.संताजी महाराज त्यावेळेचे संत हे माळकरी,टाळकरी नसुन प्रस्थापित समाज व्यवस्थेवर वार करणारे खरे वारकरी होते. तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजींनी केले संताजी महाराजांनी तैलसिंधु नावाच्या गं्रथात व्यावसायाची माहिती दिलेली आहे. सतत वर्षा पर्यंत अविरत कार्य करणा-या लढवय्या संताजीला तेंली समाज म्हणूनच जनतेवर निस्वार्थ प्रेम करणारा आणि तुकाराम माहाराजा सारख्या माणसाला सर्व परिस्थितीत साथ देणारा संताजी तेली समाजात जन्माला आला.हे तेली समाजाचे भाग्य आहे, म्हणूनच तेली समाज संताजीला दैवत मानतो असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेती सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Read Time:2 Minute, 27 Second