महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्निकचा उन्हाळी परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला. याहीवर्षी 100 टक्के निकाल लागला. तसेच एकाचवेळी 97 विद्यार्थी मेरीटमध्ये येण्याच्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. यामध्ये पाच विद्याथ्र्यांनी चक्क 100 टक्के गुण पटकावले आहे.
100 टक्के गुण घेणा-या विद्याथ्र्यांमध्ये काॅम्प्युटर विभागातून ब्रम्हाणी राजकुमार रावी,इलेक्ट्रीकल विभागातून रोशन बांगडकर,मेक्यानिकल विभागातून सारंग रामपल्लीवार,अनिमेश मिस्त्री व अमन कुरेशी यांचा समावेश आहे.
शिवाय संस्थेतील 12 विद्यार्थी 99 टक्के,17विद्यार्थी 98टक्के,तर 18 वि़द्यार्थी 97 टक्के,20 विद्यार्थी 96 टक्के,24 विद्यार्थी 95 टक्के,16 विद्यार्थी 94 टक्के,18 विद्यार्थी 93 टक्के,15विद्यार्थी 92 टक्के ,9 विद्यार्थी 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेत.
तसेच 28 विद्यार्थी 85 टक्केपेक्षा जास्त तर 11 विद्यार्थी 80 टक्कयांपेक्षा अधिक गुण घेवून उत्तीर्ण झाले आहेत. सोमय्या पाॅलिटेक्निकने 2016 पासून सुरू केलेली 100 टक्के निकालाची परंपरा जोपासत आता गुणवत्तेतही वाढ केली आहे. विद्याथ्र्यानी आपल्या याशाचे श्रेय संस्थाध्यक्ष श्री. पि.एस. आंबटकर सर,उपाध्यक्ष पियुष आंबटकर ,प्राचार्य एम.झेड. शेख,रजिस्ट्रार बिसन ,तसेच संस्थेतील कार्यरत सर्व कर्मचा-यांना दिले.
”गेल्या काही वर्षापासून संस्थाव्यवस्थापन आणि प्राघ्यापक वर्ग विद्याथ्र्यांवर प्रचंड मेहनत घेत आहे या मेहनतीचे सकारात्मक परिणाम निकालातुन बघायला मिळत आहे. व्यवस्थापन प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वयक असला तर हे नेत्रदीपक यश बघायला मिळते,संस्थाध्यक्ष म्हणून याचा मनस्वी आनंद होतो.“
पि.एस.आंबटकर,
संस्थाअध्यक्ष्,महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर.