सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विधार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन

                           महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या  डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज वडगाव चंद्रपूर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात  ‘’ एमके टेकनॉलॉजि चंद्रपूर ‘’ यांच्या सहकार्याने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या परिसरात उत्साहात पार पडली.

                            या कार्यशाळेत मयंक केमेकर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक विद्युत तंत्रज्ञान, औद्योगिक कौशल्ये तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले,उद्योग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

                            या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य जमीर शेख यांनी सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानात वाढ होऊन उद्योग क्षेत्रातील नव्या संधींबाबत जागरूकता निर्माण होते.”

                            या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य अनिल खुजे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा.धनश्री कोटकर प्रा.नवशाद सिद्धकी , प्रा.मिथुन डे तसेच प्रा. स्नेहा बोन्डे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले. इलेक्ट्रिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा.अमित देवराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

                            विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous post सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी व पॉलिटेक्निक च्या सिपेट सोबत MoU अंतर्गत करार
Next post पैरामाऊँन्ट कॉन्व्हेंट मध्ये दिक्षांत समारोह साजरा

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News