सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी AI Trainer साठी मेगा कॅम्पस ड्राइव्ह मध्ये सुवर्ण संधी……

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज वडगाव चंद्रपूर येथे विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “AI Trainer” पदासाठी भव्य कॅम्पस सिलेक्शन ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेगा ड्राइव्ह दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता सोमय्या सेमिनार हॉल येथे आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच याउपक्रमामध्ये XBS कंपनी मार्फत Work From Home (WFH) स्वरूपातील नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या नोकरीमध्ये लवचिक वेळ, घरून काम करण्याची सुविधा तसेच आकर्षक मानधन दिले जाणार आहे.

या कॅम्पस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना “Robot Hand Training Work” वर आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून, दर तासाला  मानधन तसेच ६ तासांनंतर  ओव्हरटाईम देण्यात येणार आहे. पगार दर १५ दिवसांनी दिला जाणार असून कोणतीही वयोमर्यादा, शैक्षणिक किंवा भाषेची अट नाही.

या मेगा ड्राइव्हसाठी सोमय्या पॉलिटेक्निकचे सर्वच विभागातील विद्यार्थ्यांसाठी संघनक इंजिनिअरिंग विभाग,इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग ,मॅकेनिकल इंजिनिअरिंग विभाग, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग, इलेट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग मायनिंग इंजिनिअरिंग विभाग, डिप्लोमा इन मेडिकल लेबॅटरी इंजिनीरिंग विभागातील सर्व विधार्थांसाठी सुवर्ण संधी आहे. तसेच  माजी व विद्यमान विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी आपले नाव व CV दिलेल्या WhatsApp क्रमांकावर पाठवावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“ शिक्षणासोबत संस्कार, क्रीडेसोबत शिस्त आणि करिअरसाठी संधी ” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्व म्हणून अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर यांचे योगदान चंद्रपूर जिल्ह्यात प्रेरणादायी ठरत आहे तसेच  “AI क्षेत्र हे भविष्याचे तंत्रज्ञान असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,”  तसेच शिक्षणासोबत रोजगार मिळावा या दृष्टीकोनातुन संस्थेचे उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,सेक्रेटरी सौ.प्रीती आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य जमीर शेख ,उपप्राचार्य अनिल खुजे यांनी आव्हान केले आहे.

 

 

 

Previous post सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पोस्टर मेकिंग स्पर्धेत विधार्थांचा उत्साहात सहभाग
Next post सोमय्या ग्रुप येथे गुढी उभारून नवं वर्षाचे स्वागत

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News