सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग येथे विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत “स्मार्ट मीटर पखवाडा”अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, चंद्रपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत “स्मार्ट मीटर पखवाडा” अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आले.

ही कार्यशाळा Maharashtra State Electricity Distribution Company Limited (महावितरण) व Montecarlo Limited यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

 

वरिष्ठ व्यवस्थापक श्री.चिकाटी राव यांनी विधार्थांना माहिती देत असताना कार्यशाळेत स्मार्ट मीटरचे तांत्रिक वैशिष्ट्ये, बसविण्याची पद्धत, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली, ऊर्जा बचत, पारदर्शक बिलिंग प्रणाली तसेच आधुनिक वीज वितरण व्यवस्थेमधील स्मार्ट मीटरचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध शंका निरसन करून घेतले.

 

यामध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. अमित ठाकरे यांनी जुन्या मीटर व स्मार्ट मीटर यांतील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला, तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अनिल खुजे यांनी विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य जमीर शेख, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Previous post सोमय्या ग्रुप येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
Next post सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन चंद्रपुरात लावणीचा ” गिनीज ” रेकॉर्डमध्ये नोंद

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News