

सोमय्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुमठाना भद्रावती येथील प्राचार्य डॉ.शीतल कोलपाकवार ( कापर्तीवार ) राष्ट्रीय वैद्यकीय उत्कृष्ठ पुरस्कार २०२६ सर्वत्कृष्ट आयुर्वेद चिकित्सव आणि प्रशासक,चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, हा कार्यक्रम बोगविला, नागपूर येथे घेण्यात आला, तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभले मा.श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सर्वाना देण्यात आला .
सोमय्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शीतल कोलपाकवार ( कापर्तीवार ) डीन ह्या बीएमएस च्या विधार्थाना नवीन नवीन आयुर्वेदिक औषधीचे संशोधन करून विधार्थाना ज्ञान देतात,तसेच शरीर, मन आणि आत्मा यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करते, यात नैसर्गिक औषधी वनस्पती, आहार, व्यायाम आणि पंचकर्म यांसारख्या उपचार पद्धतींचा वापर करून शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवली जाते, जेणेकरून आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य कशे मिळेल ह्या बद्दल विधार्थाना ज्ञान देत असतात.
तसेच आयुर्वेद ,मानव आणि निसर्ग यांच्यातील संतुलन असणे गरजेचे आहे,प्रत्येकानी प्राचीन ज्ञान ,परंपरेला अंगिकारला पाहिजे, तसेच पृथ्वीच्या कल्याणासाठी आयुर्वेदिक वनस्पती लागवड ,जैवविविधतेचे सर्वधन करणे गरजेचे आहे ,तसेच स्थानिक व ऋतूनुसार आहार निसर्गावर कमी ताण आणतो, आयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या clinical trials या पद्धतीनुसार तपासलेली नसतात. त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे.
” जीवो जीवस्य जीवनम “हि आयुर्विदिकय संकल्पना माणूस आणि निसर्ग याना परस्परावलंबी नात्यांनी जोडते.
तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा सोमय्या आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुमठाना भद्रावती चे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांनी प्राचार्य डॉ.शीतल कोलपाकवार ( कापर्तीवार ) यांचे अभिनंदन केले.
