महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेज आणि सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलाविषयक कायदा आणि जागरूकता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी मंचावर MSPM ग्रुपचे डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेजचे प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे , उपप्राचार्य श्री. अनिल खुजे, सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज प्राचार्य श्री.जमीर शेख ,उपप्राचार्य दीपक मस्के,तसेच प्रा.मोजस, प्रा.जोगे आणि प्रमुख प्रा.अतिथी शीतल बोरा या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनी कायदेविषयक मार्गदर्शन करीत असताना महिलांविषयी असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली तसेच महिलांच्या उन्नतीसाठी शासनाने अनेक कायदे केले आहे,ते जाणून घेणे आणि त्याबद्ल जागरूक असणे महत्वाचे आहे.
सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य श्री.जमीर शेख यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्या दिल्या तसेच विधार्थनींना शिक्षण करीत असतानाच महिला अधिकार,तसेच भारतीय घटनेबाबत जागरूकता,घटनात्मक अधिकार व कर्तव्याबाबत विध्यार्थाना जागरूकता करून दिली.
तसेच सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि कॉलेजचे प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे यांनी आंतराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या हक्काच्या चळवळीचे प्रतीक असून त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा दिवस पाळला जातो,सर्वत्र बदल घडवायच्या असेल तर शैक्षणिक,सामाजिक,राजकीय,प्रशासकीय व आर्थिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना स्थान मिळाले पाहिजे असे प्रतिपादन आपल्या भाषणातून केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा.शीतल बोरा याना डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सुत्रसंचालन विद्धार्थीनी राशी मोहुर्ले,मोहित बोबडे आणि आभार प्रदर्शन ग्रेसी देवगडे ,शशिकांत हटकर यांनी केले.