रोटरी क्लब द्वारा सोमय्या पॉलीटेक्नीकमध्ये जागृतकता (अवेअरनेस) उपक्रम विध्यार्थ्यांसाठी जनजागृकता,व्यसनमुक्त धडे

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीकतर्फ विध्यार्थ्यांसाठी अवेअरनेस या विषयावर सेमिनार रोटरी क्लब चंद्रपूर द्वारा आयोजित करण्यात आले होते, प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य दीपक मस्के तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री.अजय पालेवार,संचालक डॉ.मनीषा पडगिलवार,सचिव मिलिंद बोडखे,डॉ.राम भारत सर आणि इतर प्रमुख मान्यवर मंचावर उपस्थित होते,सर्वप्रथम मान्यवरांचे पुष्पगुच्य देऊन स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात  करण्यात आले.

डॉ.राम भारत आणि प्रमुख मान्यवरांनी  विध्यार्थाना जागरूकता वार्ता (अवेअरनेस) याबद्दल माहिती दिली त्यामध्ये व्यसनमुक्ती,तंबाखू विरोधी,अमली पदार्थ विरोधी,सुरक्षित,असुरक्षित स्पर्श मासिकपाळी स्वच्छता,गर्भशयाच्या मुखाचा कर्क रोग,मानसिक आरोग्य,भ्रमणध्वनी वाढते प्रमाण आदी व्यसन मुद्दयांवर चर्चा करून त्यावर प्रकाश टाकण्यात आले.

तसेच विध्यार्थानशी संवाद साधत असताना एखादा व्हीडिओ भरपूर वेळा पाहून झाला असेल तरी तुम्ही तो परत पाहाता का? एकदा फोन हातात घेतला की तुम्ही एकापाठोपाठ व्हीडिओ, मेसेजेस, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर, इमेल, युट्यूब वेगवेगळीअप्स पाहात बसता का? आपला फोन वापरण्यात भरपूर वेळ जातोय हे लक्षात येऊनही फोन बाजूला ठेवावासा वाटत नसेल तर त्याची कारणं शोधणं आवश्यक आहे त्यांतून बाहेर पडायचं मार्ग म्हणजे पुस्तक वाचणे,पुस्तकाला आपला मित्र बनविणे,तसेच मित्र मंडळींसोबत खेळ खेळणे,गप्पा मारणे,संवाद करणे इत्यादी चांगल्या सवयी लावून व्यसनमुक्त होऊ शकतो.

सूत्रसंचालन प्रा.डॉ.नितेश चव्हाण यांनी केले.

या कार्यक्रमाला शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीकमध्ये विध्यार्थ्यांसाठी स्त्री सक्षमीकरण (WOMEN EMPOWERMENT) कार्यक्रमाचे आयोजन
Next post सोमय्या ग्रुप येथे शिवाजी महाराज जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News