क्रीडा स्पर्धेत सहभागी होवून विध्यार्थानी सुप्त गुणांना वाव द्यावा…. श्री.पी.एस.आंबटकर
इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित शासकीय तंत्रनिकेतन नागपूर येथे व्हॉली बॉल स्पर्धा आयोजित केले होते , यामध्ये 30 ते 32 संघ उपस्थित होते,अंतिम सामना हा सोमय्या तंत्रनिकेतन व NIT नागपूर यांच्यात चुरशीचा सामना झाला,त्यामध्ये सोमय्या चमू उपविजेते ठरले .
सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजच्या विध्यार्थाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत संस्थेचे नाव मोठे केले ,ह्यास्पर्धात कृष्णा ठावरी,प्रेम सरकार,अल्तमश शाह ,साहिल खरवाडे,साहिल शेख,पृथ्वी पुप्पला, अमान इम्तियाज,विशाल दुर्गम ,प्रमेय येमुरले,अभिजित मुंडे,सॊयाब ईशाद ,श्रीसाई कलवला. या विधार्थांनी सहभाग नोंदविला होता, त्यांच्या यशाबद्धल संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य दीपक मस्के,उपप्राचार्य जमीर शेख रजिस्टार बिसन सर यांनी हार्दिक अभिनंदन केले.
तसेच विभागप्रमुख आणि शिक्षक,शिक्षकेतर यांनी सर्व विधार्थांचे अभिनंदन केले,तसेच प्रा.आशिष भरडकर यांनी संघाची जवाबदारी घेतली आणि क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे, प्रा.धनश्री कोटकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत असून शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचाऱ्यांना अभिनंदन केले.