कृत्तिका शुक्ला,अक्षय भोटकूरी आणि खुशाल मंदाडे यांनी मारली बाजी
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व IEDSSA अंर्तगत विभागीय व्हेटलिफ्टिंग आणि रेसलिंग स्पर्धेत सोमय्या पॉलीटेक्नीकचे विध्यार्थाने यश प्राप्त केले, ह्या स्पर्धा नागपूर विभागीय अंर्तगत जी. एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनेरींग,नागपूर येथे आयोजित केले गेले होते,यास्पर्धेत चंद्रपूर,नागपूर ,गोंदिया,भंडारा,गडचिरोली ह्या जिल्ह्यातून पॉलीटेक्नीक आणि फार्मसी विभागातून विधार्थांनी प्रतिनिधीत्व केले.
मुलींच्या व्हेटलिफ्टिंग या स्पर्धेत कृत्तिका शुक्ला संगनक विभागातील प्रथम वर्षांतील विधार्थीनि ६४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला ,तसेच अक्षय भोटकूरी मायनींग प्रथम वर्षांतील विध्यार्थाने ५९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला,तसेच मुलांच्या व्हेटलिफ्टिंग वजन गटात ९४ किलो वजन गटात खुशाल मंदाडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आणि उपविजेता ६७ अमित मैदाम आणि ५५ किलो वजन गटात राजकुमार कदम उपविजेता ठरले, मान्यवरांच्या हस्ते त्यांना सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले
विध्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच जीवनातील खेळाचे महत्व लक्षात घेऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होतो,शरीराला तंदुरुस्त बनविण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक असते, या स्पर्धेत अनेक विध्यार्थानी सहभाग नोंदविला आहे.या विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी क्रीडा स्पर्धे घेण्यात येते,या विध्यार्थाना ज़िल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत संधी मिळते,हि स्पर्धा चांगली आणि खेळ भावनेनी व्हावी असे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर असे आव्हान केले आहे.
तसेच प्रा. योगेश कुमरे यांनी संघाची जवाबदारी घेतली आणि क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे, प्रा.धनश्री कोटकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत असून शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचाऱ्यांना अभिनंदन केले.