इन्टर इंजिनिअरींग डिप्लोमा स्टुडन्ट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत (IEDSSA) आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित नागपूर विभागीय बास्केटबॉलचे स्पर्धेचे सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज येथे दिनांक २३ जानेवारी २०२५ ला आयोजन करण्यात आले होते ,यावेळी कार्यक्रमाला संस्थापक श्री. पी.एस.आंबटकर, प्राचार्य श्री.दीपक मस्के , उपप्राचार्य श्री.जमीर शेख, प्रा. डॉ. पद्मनाभ गाडगे, प्रा.मोजेस ,रजिस्टार बिसन सर उपस्थित होते.सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून पाहुण्याचे स्वागत करण्यात आले, यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातुन खेडाळुना खेळाचे महत्व यावर प्रकाश टाकला, बास्केटबॉल सामन्याचे थाटात उद्धघाटन करून सामन्याची सुरुवात झाली.
सोमय्या डिप्लोमा इन फार्मसी चंद्रपूर,यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी चंद्रपूर,बजाज पॉलीटेक्नीक चंद्रपूर,गुरुसाई पॉलीटेक्नीक,सोमय्या डिप्लोमा इन इंजिनिअरींग चंद्रपूर,जि.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग नागपूर,बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि बल्लारपूर आणि इतर कॉलेजच्या चमूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत अनेक विध्यार्थानी सहभाग नोंदविला आहे.या विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी क्रीडा स्पर्धे घेण्यात येते,या विध्यार्थाना विभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत संधी मिळते,हि स्पर्धा चांगली आणि खेळ भावनेनी व्हावी असे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर असे असे विध्यार्थाना पटवून दिले.
सर्वच विध्यार्थानी उत्तम कामगिरी करत आपल्या कॉलेज नाव मोठे केले,तसेच सोमय्या पॉलीटेक्नीक चंद्रपूर,कॉलेज ला उपविजेते पद पटकाविले, या मध्ये कार्तिक कोसरे,रतन गौरकार,कृष्णा अटकापुरवार,विकी मुनघाटे,हितांशू येमूलवार,साहिल शेख,क्षितिज हरबडे,तिलक चिमुलरकर,आर्यन ठाकरे,कुशल मंदाडे इत्यादी विध्यार्थानी सहभाग घेतला होता संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी हार्दिक अभिनंदन केले तसेच क्रीडास्पर्धेचे भार संस्थेचे क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे आणि प्रा.धनश्री कोटकर ,सचिन चाफले,अल्ताफ खान व संघ संचालक म्हणून प्रा.योगेश कुमरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.