श्री.पी.एस.आंबटकर याना शिक्षण महर्षी पुरस्कारांनी सन्मानित

                 तेली युवक मंडळ ज़िल्हा चंद्रपूर यांच्या श्री.पी.एस.आंबटकर याना  शिक्षण महर्षी पुरस्कारांनी प्रमुख मान्यवरच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

               महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक श्री.पी.एस.आंबटकर (शिक्षण महर्षी) याना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सर्वसामान्याना उपलबद्ध करून दिलेल्या शिक्षणाच्या संधी साधलेले मानव विकासाचे ध्येय तसेच दुर्बल व पीडित या करिता घटकाकरिता असलेली तळमळ यातून घडणारे सामाजिक कार्य आणि समाज प्रबोधन या करिता लाभलेल्या अमूल्य योगदानाबध्दल याना शिक्षण महर्षी पुरस्कार बहाल करण्यात आला.

                  श्री. पांडुरंग आंबटकर यांनी एका लहान कॉन्व्हेटपासून सुरुवात करीत ते समजकार्यापर्यंत त्यांचे कार्य करीत आहे,शिक्षण क्षेत्रात अतिशय मेहनत,दृढ निश्चय, तल्लख बुद्धीने त्यानी अनेक शाखा उभ्या केल्या त्यांनी अलीकडे श्री. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या ४०० वि जयंती महोत्सव कार्यक्रमात श्री.संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ,बम्हपुरीजीवन गौरव पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते, तसेच प्रेरणा -२४ उपवधू-उपवर पुस्तिकेचे प्रकाशन तथा मान्यवरांचा सत्कार सोहळा ,सामाजिक मेळावा  याचे आयोजन करण्यात आले होते.

                तसेच समाजासाठी व्यक्तीचे योगदान काय असते ते आपल्या भावनातून पटवून दिले,समाज संघटित असणे गरजेचे असून समाजातील व्यक्तीच्या मागे ठामपने सर्व सक्तिनेशी उभे राहिले पाहिजे, स्वतःचे व्यक्तिमहत्व कशे बहरले यावरही त्यांनी प्रकाश टाकला, तसेच नव्या युगात नवीन पिढीच्या जडणघडणीनुसार शैक्षणिक बदल होणे आवश्यक असल्याचे मत श्री.पांडुरंग आंबटकर यांनी व्यक्त केले.

Previous post सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज भद्रावती येथे विधार्थ्यांसाठी फ्रेशर्स डे आयोजन
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक IEDSSA बास्केटबॉल टूर्नामेन्टचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News