महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
सर्व प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीं यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केले, यावेळी उपप्राचार्य श्री.जमीर शेख यांनी समयोचित मार्गदर्शन केले तसेच मान्यवराने भाषण देत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावरच भारतातील प्रत्येक नागरिकाने चालले पाहिजे किंबहुना त्यांच्याच विचारामध्ये प्रगतशील भारताचा आत्मा लपलेला आहे ,प्रत्येकाने त्यांचं जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन सत्याच्या मार्गाने जीवन कंठीत केले पाहिजे.
जगाला सत्याग्रहाबरोबर अहिंसेचे तत्वज्ञान शिकविणाऱ्या गांधीजींचा जन्मदिवस जगभरात आंतराष्ट्रीय अहिंसा दिन मानून साजरा केला जातो.अहिंसेच्या तत्वावर चादरीत सत्यग्रहाचा उपयोग गांधीजींनी सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
अहिंसेचा तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी “दांडी यात्रा “,”भारत छोडो आंदोलन” ,”चले जाओ”,”मिठाचा सत्याग्रह “,अशा अनेक चळवळी तसेच सत्य आणि अहिंसा या तत्वावर आधारित आंदोलनात ब्रिटिश सरकारला धारेवर आणले,गांधीजींनी सदयव स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कंपन्यांचा विरोध करीत खादीचा पुरस्कार केला.
तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीं याचा जन्म दिवस साजरा केला,”जय जवान,जय किसान “चा गुरु मंत्र दिला,देशाचा आधार स्तंभ शेतकरी व सैनिक याना विशेष महत्व दिले, तसेच शास्त्रींजी हे शांतता आणि लोकशाहीचे खरे चॅम्पियन होते,त्यांनी भारताला जगात शांततेचा आश्रयदाता म्हणून कल्पना दिली असे अनेक मान्यवरांनी मौल्यवान मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, उपप्राचार्य श्री.जमीर शेख, प्रा.राजदसिद्धकी,रजिस्टारराजेशबिसन,प्रा.बोबडे,प्रा.नागराळे,प्रा.मस्के,प्रा.बाबरे,प्रा.ठाकरे,प्रा.चव्हाण,प्रा.मोजस, यांची उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचा यशश्वीतेकरीता सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य लाभले.