मॅकरून स्टुडन्ट अकॅडमि सीबीएसइ स्कूल भद्रावती येथे शिक्षक दिन साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमि सीबीएसइ स्कूल भद्रावती येथे भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुश आंबटकर(MSPM), डायरेक्टर पायल मॅडमसोमय्या आयुर्वेदिक कॉलेज भद्रावती, प्राचार्य राजदा मॅडम, प्रा.पिंपळकर सर(आय.टी.आय.), उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वल करुन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन च्या प्रतिमेला तसेच माँ भवानी, माँ सरस्वती माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली, शिक्षकदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि शिक्षक दिनाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
” शिक्षक-अपूर्णाला पूर्ण करणारा
शिक्षक शब्दानी ज्ञान वाढविनारा
शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा“
5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन प्रथमतः आई या गुरुला नंतर माझ्या वडील या गुरुना आणि ज्यांनी माझ भविष्य घडविले त्या तमाम शिक्षकाला , देवांना नमन, तसेच शिक्षक दिनानिमित्य विध्यार्थांचा व शिक्षकाचा उत्साह स्पूर्ती वाढण्याकरिता दरवर्षी आयोजन करण्यात येते, यावर्षी डॅन्स, गायन फॅनश शो अशे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.
विध्यार्थांनी व शिक्षकांनी आपली कला सादर केली.
त्यामध्ये प्रत्येक वर्गातील विध्यार्थांनी आपली कला सादर केली.त्यामध्ये मिताली ग्रुप ,हर्षित ग्रुप,ख़ुशी ग्रुप,अनेक विधार्थानी कार्यक्रमात भाग घेतला, विधार्थानी आणि शिक्षकांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
” शिकवता शिकविता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ देनारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक….
सुत्रसंचालन आकांशा मशाखेत्री,सुमित्रा गागरे, हिया पेटकर यांनी केले, या कार्यक्रमा करीता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.