सोमय्या पॉलीटेक्नीक येथे विधार्थ्यांसाठी सहयोग आणि ध्यान साधना शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे योग आणि ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आला केला असून सोमय्या पॉलीटेक्नीकचे डायरेक्टर अंकिता पियुष आंबटकर ,प्राचार्य डॉ. पद्मनाभ गाडगे,उपप्राचार्य जमीर शेख,सहजयोगा मेडिटेशन चंद्रपूर येथील योगा केंद्र प्रमुख सुचित्रा गुप्ता ,सीमा घडीनकर,नेहा लेखवानी , वीणा लाखनी ,प्रवीण ताजने मंचावर उपस्थित होते, मान्यवर योग आणि ध्यान विषयी विध्यार्थाना मार्गदर्शन करीत असताना योगा हि भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे,तसेच विध्यार्थाना सहजयोग ध्यान साधनेचे लाभ ,शारीरिक विकार उत्पन्न होत नाही,शारीरिक,मानसिक दोष दूर होऊन तो संतुलित होतो, योगा फक्त व्यायामाचा प्रकार नाही तर, योगामुळे आपल्या संपूर्ण शरीराला कसंरत प्राप्त होते. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे.दररोज योग केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो,शरीर आणि मन शांत करण्यासाठी योग खूप फायदेशीर मानला जातो. योगा केल्यानी शरीराला ऊर्जा मिळते,तसेच यामुळे श्वसन,ऊर्जा आणि चैतन्य सुधारते.योगामुळे तणाव दूर होतो,चांगली झोप लागते.
सध्याच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनामध्ये आपण सर्व काम करतो परंतु आपल्या शरीराकडे लक्ष देण्याकरता पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे आपल्या शरीरावरून आपले दुर्लक्ष होते.
योगा म्हणजे काय,योगाचा इतिहास काय आहे,फायदे कोणते आहे,विध्यार्थाना उत्तम आरोग्य हवे तर योग करण्याशिवाय पर्याय नाही. एकच दिवस योगा करून उपयोग नाही तर तिला चळवळीचे रूप मिळाले पाहिजे.विध्यार्थानी योग करण्याचे महत्व सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सांगितले पाहिजे तसेच दररोज योगा केला गेला पाहिजे,योगा करा,आणि तंदुरुस्त राहा. योग हा व्यायामाचा एक प्रकार आहे योग म्हणजे शरीराचा व्यायाम नसून, योग हा मानवी मन आणि आत्मा यांची क्षमता जाणून घेणाऱ्या विज्ञानाचा एक भाग आहे. योगाचे फायदे विध्यार्थाना सांगत असताना सर्व स्तरांवर तंदुरुस्ती तसेच योगा अभ्यास मानवी जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो. अशाप्रकारे आपल्या प्राचीन संस्कृतीपासून योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
सूत्रसंचालन प्रा.नवशाद सिद्धकी यांनी केले, यशस्वीतेसाठी प्रा.विद्या बल्लमवार ,प्रा.धनश्री कोटकर, प्रा.प्रियंका जेणेकर,प्रा.तृप्ती एकरे,प्रा.विजय थेरे ,प्रा.नीरजा ,प्रा.नेहा पाचभाई, ग्रंथपाल भारती घटे संस्थेचे सर्व प्राध्यपकःवर्ग आणि शिक्षक आणि शिक्षकेत्तरी वर्ग उपस्थित होते.