मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी CBSE स्कूलतर्फ शारदा मादे्शवार UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास सत्कार समारंभ

मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी CBSE स्कूलतर्फ शारदा मादे्शवार UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास सत्कार समारंभ

सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांनी शारदाचे केले कौतुक

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी CBSE स्कूलततर्फे शारदा विजया गजानन मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा २८५ रँकने उत्तीर्ण झाली आहे त्या यशाबद्दल विध्यार्थिनीचे कौतुक केले आहे.

औद्याेगिक नगरी असलेल्या चंद्रपुरची कन्या शारदा विजया गजानन मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा मध्ये यश प्राप्त केले आहे. मुलीने आयआरएस होण्याचे स्वप्न साकार केल्याने सर्व शाळा ,कॉलेज आणि आईवडिलांनी आनंद व्यक्त केला. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे वरिष्ठ प्रबंधक तथा जिल्हा विकास प्रबंधक तथा कवी, लेखक गजानन मादे्शवार यांची शारदा ही मोठी मुलगी. येथील मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंटमध्ये २०१३ मध्ये दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

UPSC परीक्षेत यश मिळविणारे विध्यार्थाना मॅकरून स्टूडन्ट अकॅडमीचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी अभिनंदन केले. बालपणापासून आयआरएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या शारदाने बिटेकची परीक्षा उत्तीर्ण होताच दिल्लीत राव स्टडी सर्कल या ॲकेडमीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षाचे क्लासेस लावले होते. तिथे नियमित अभ्यास करून आयएएस अधिकारी यांचे मार्गदर्शनही घेतले. सलग चार वर्षे राव ॲकेडमीत अभ्यास केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली.

पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आल्यानंतरही सिव्हिल सर्व्हिसेस होण्याचे प्रयत्न मुलीने सोडले नाही. अपयशानंतरच यश मिळते या म्हणीप्रमाणे पहिले तिने प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात मुलगी यशस्वी झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आला तेव्हा मुलगी दिल्ली येथेच असल्याची माहिती मादे्शवार यांनी दिली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करतांना चंद्रपूर व गडचिरोलीतील जिल्हाधिकारी यांचे

वेळाेवेळी मार्गदर्शन तिला मिळत राहिले. तसेच महाराष्ट्रातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांनीही तिला वेळ प्रसंगी मार्गदर्शन दिल्याचेही मादे्शवार यांनी बोलतांना सांगितले. विशेष म्हणजे २०२४ मध्ये चंद्रपुरातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणारी शारदा विजया गजानन मादे्शवार ही एकमेव मुलगी आहे. आयएएसची परीक्षा उत्तीर्ण करून चंद्रपूर जिल्ह्यासोबतच तिने शाळेचेही नाव मोठे केले आहे. या यशाबद्दल तिचेवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य जमीर शेख,प्रा.दीपक मस्के,प्राचार्य राजकुमार सर, तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीक अंतर्गत महाराष्ट्र दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News