सोमय्या पॉलीटेक्नीक अंतर्गत महाराष्ट्र दिन साजरा

सोमय्या पॉलीटेक्नीक अंतर्गत महाराष्ट्र दिन साजरा

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित वडगाव येथील सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आले, याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस. आंबटकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य दीपक मस्के,रजिस्टार बिसन सर मंचावर उपस्थित होते.

१ में रोजी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहाने आणि सर्व एकत्र येऊन साजरा करण्यात येतो, १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे, 1 मे रोजी म्हणजेच आजच्या दिवशी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामदार दिन म्हणूनही ओळखला जातो.

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा वारसा असलेला राज्य आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात अनेक थोर समाज सुधारक होऊन गेले. आपल्या महाराष्ट्र राज्यात सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याची भूमी हि वीर पुरुषांच्या पवित्र विचारांनी पावन झालेली भूमी आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्मांने बलिदान दिले तेव्हा कुठे आपल्याला आपले महाराष्ट्र राज्य मिळाले. त्या हुतात्मांचे स्मरण या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्याने शिक्षण क्षेत्र, क्रीडाक्षेत्र ,चित्रपट सृष्टी, तंत्रज्ञान अश्या अनेक क्षेत्रात उत्कृष्ट भरारी घेतलेली आहे. १ मे महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्या देऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

ह्या कार्यक्रमाकरिता संस्थेतील विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षेकत्तरी कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous post मॅकरून स्टुडन्ट अकॅडमि सीबीएसइ वणी येथे पदवी (ग्रॅड्युएशन) दिवस साजरा
Next post मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी CBSE स्कूलतर्फ शारदा मादे्शवार UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास सत्कार समारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News