सोमय्या पॉलीटेक्नीक येथे गर्ल्स बास्केटबॉल सामन्याचे थाटात उद्धघाटन सोमय्या पॉलीटेक्नीकच्या गर्ल्स बास्केटबॉल चमू विजेते

सोमय्या  पॉलीटेक्नीकच्या गर्ल्स बास्केटबॉल चमू विजेते

                                   IEDSSA आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ द्वारा आयोजित नागपूर विभागीय बास्केटबॉलचे स्पर्धेचे आयोजन फरवरी २०२४ रोजी सोमय्या पॉलीटेक्नीक येथील मैदानात गर्ल्स बास्केटबॉल सामन्याचे थाटात उद्धघाटन करण्यात आले,यावेळी कार्यक्रमाला संस्थापक श्री. पी.एस.आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के, प्रा.अनिल खुजे, प्रा.मोजेस सर उपस्थित होते.सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून बास्केटबॉल सामन्याचे सुरुवात करण्यात आले.यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातुन खेडाळुना खेळाचे महत्व यावर प्रकाश टाकला आणि बास्केटबॉल सामन्याची सुरुवात झाली.

                               नागपूर,चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,गडचिरोली पॉलीटेक्नीक कॉलेजच्या चमूंनी भाग घेतला आहे. या स्पर्धेत अनेक विध्यार्थानी सहभाग नोंदविला आहे.या विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी क्रीडा स्पर्धे घेण्यात येते,या विध्यार्थाना नवविभागीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत संधी मिळते,हि स्पर्धा चांगली आणि खेळ भावनेनी व्हावी असे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर असे आव्हान केले आहे.

                                    यास्पर्धेकरिता अंतिम सामना  सोमय्या पॉलीटेक्नीक आणि  बी.आय.टी.पॉलीटेक्नीक यांच्यामध्ये संघात संघर्ष झाला असून सोमय्या पॉलीटेक्नीक गर्ल्स बास्केटबॉल संघ विजयी झाला आणि बी.आय.टी.पॉलीटेक्नीक उपविजयी ठरले. या संघात लक्ष्मी भोयर,यशस्वी सोनुने,गुंजन कांबळे,अलिपश्या शोम,सुहानी तांबे ,सृष्टी टिपले,वेदांती भागवत,उन्नती धकाते,अपर्णा नांदुरकर,इशिका लोहकरे,श्रेया खोब्रागडे,पलक रामटेके  विध्यार्थाचा समावेश होता.

                       सूत्रसंचालन  प्रा.नौशाद सिद्धकी यांनी केले,या स्पर्धेचे भार सांभाळणारे  क्रीडा प्रमुख प्रा.धनश्री कोटकर, प्रा. कमलेश ठाकरे, तसेच सचिन चाफले,अल्ताफ खान , तसेच या प्रसंगी संस्थेचे सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

 

 

 

 

 

Previous post सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विध्यार्थाने ” व्हेटलिफ्टिंग ” स्पर्धेत सुयश
Next post सोमय्या पॉलीटेक्नीकच्या विद्यार्थिनीचा ऍथलेर्टिक स्पर्धेत घवघवीत यश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News