सोमय्या पॉलीटेक्नीक येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, प्रा.मस्के ,प्रा.खुजे , रजिस्टर श्री.बिसेन सर यांची उपस्तित होते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून घोषित केला होता, तसेच राजमाता जिजाऊची जयंती साजरी करण्यात आली.स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल माहिती दिली, स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते, त्यांचा जन्म १२ जानेवारी मध्ये कलकत्ता येथे झाला ते लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते, ते शाळेतील सर्वात हुशार विधार्थी होते.
रामायण,महाभारत,भगवतगीता,वेद आणि पुराणे यांचा त्यानी सखोल अभ्यास केला होता.रामकृष्ण परमहंस हे नरेंद्रनाथाचे गुरु होते,गुरूंनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले, त्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार जगभर करण्याचे कार्य केले,तसेच शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत त्यांचा भाषणाचा सर्वावर प्रभाव पडला तेथूनच ते विश्वप्रसिद्ध झाले. ‘ उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही ‘ हा संदेश स्वामींनी सर्व तरुणांना दिला.ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढीसमोर आदर्श नाही तर संपूर्ण जगातल्या युवापिढीसमोर आदर्श ठेवला.
तसेच त्यांनी संपूर्ण भारतभर ज्ञानदानाचे व समाज प्रबोधनाचे कार्य पार पाडले त्यांचा जन्मदिवस ‘’राष्ट्रीय युवा दिन ‘’ म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते .