सोमय्या ग्रुप आय .टी. आय .अंतर्गत विध्यार्थांचा ज़िल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शिनीमध्ये सहभाग

सोमय्या ग्रुप आय .टी. आय .अंतर्गत विध्यार्थांचा ज़िल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शिनीमध्ये सहभाग

पुढे शिक्षण घेत राहा ….श्री .पी.एस.आंबटकर

कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,मुंबई अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय द्वारा ज़िल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शनी दिनांक २०डिसेंबर २०२३ ला आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.

सर्व शासकीय व अशासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था तसेच अनुदानित अशासकीय एम.सी.व्ही.सी.व्होकेशनल संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करून ज़िल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शिनीच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री. पी. एस.आंबटकर तसेच ज़िल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.रवींद्र मेहंदळे, प्राचार्य कल्पना खोब्रागडे, प्रा.वानखेडे, प्रा.डहाटे, प्रा.डांगे, प्रा.किलनाके, प्रभारी प्रा.गेडकर, प्रा.मोहितकर, प्रा.शेंडे, तसेच संस्थेचे प्राचार्य पिंपळकर, प्रा.जोगे, प्रा.खिरटकर सर आदी उपस्थित होते.

यामध्ये माँ.भवानी आय.टी.आय.भद्रावती येथील विधार्थाने रिमोट कंट्रोल डोमेस्टिक अँप्लिअन्सस प्रोजेक्ट सादर केला, त्यामध्ये विधार्थी सतीश पिडगू, प्राधिक येरेकर, चंदन नगराळे, हर्षल ठाकूर, राज कुमवतवार यांचा ज़िल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शनी सहभाग होता,तसेच सोमय्या प्राव्हेट आय.टी. आय. चंद्रपूर पैंडलं ऑपरेटेड हाच्क्सव मशीन प्रोजेक्ट सादर केला, यामध्ये तेजस पोटाला, रोशन डहाके, उमाशंकर वर्मा, गौरव मुर्वतकर, तसेच परमॉण्ट प्राव्हेट आय. टी. आय. चंद्रपूर यांनी ऑटोमॅटिक सोलर स्ट्रीट अँड होम लाइट माँडेल बनविले त्यामध्ये रामसिंग चव्हाण, संघर्ष गेडाम , कुणाल रायपुरे, आर्यन चित्तावार आदी विधार्थाने ज़िल्हा स्तरीय तंत्र प्रदर्शिनीमध्ये सहभाग नोंदविला होता.

तसेच सोमय्या ग्रुपचे संस्थापक श्री.पी.एस.आंबेकर यांनी शिक्षणाचे महत्व सांगत कोणतेही कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी मनात ज़िद्द असावी लागते, ज्याप्रमाणे तुम्ही स्वप्न पहाल,त्याप्रमाणे कृती योग्य कराल तर ती स्वप्न कृतीत उतरतात,त्यामुळे आपण केवळ व्यवसाय प्रमणप्रत्रधारकच न राहता पुढेही शिक्षण घेत राहावे.

विध्यार्थाना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, याकार्यक्रमात प्रा.अशोक यादव , प्रा.अभिशेख वाणी, प्रा.नागेश गुरुनुले आदीनी शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Previous post MSPM ग्रुपचे संस्थापक श्री.पांडुरंगजी आंबटकर याना २०२३ उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित
Next post सोमय्या पॉलीटेक्नीक येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News