महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वि जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ.अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसन सर उपस्थित होते, सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. त्यांच पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाजसुधारक होते. डॉ. भीमराव आंबेडकरनी दलितांच्या उद्धाराकरिता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला. त्यांचा जन्म १४ एप्रिल रोजी झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मिती मागचा उद्देश देशातील जातीपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे हा होता. सोबतच सर्वाना समानतेचा अधिकार देणे हा होता. तसेच त्यांनी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला, अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट केले, महिलांना अधिकार मिळवून दिले, समाजातील वेगवेगळ्या वर्गामध्ये पसरलेल्या अंतराला संपवलं.
देशाला सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, शैक्षणिक, धार्मिक, एतेहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ओद्योगिक, संविधानिक, सह वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक काम करून राष्ट्राच्या निर्माणात अमूल्य योगदान दिले.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .