
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज तर्फ पृथ्वीराज चषक मुलीचे क्रिकेट क्रीडा स्पर्धचे आयोजन करण्यात आले,स्पर्धेचे उदघाटन २५ फरवरी २०२३ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर ,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, संचालक सौ.अंकिता आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख, रजिस्टार श्री.राजेश बिसन यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धेत विध्यार्थ्यानी उत्तम कामगिरी करत असून संघात चुरशीचा सामना झाला,तसेच मुलीच्या क्रिकेट सामना सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजचे ग्रॉऊंड इथे झाले. या स्पर्धेत विजेताला यामध्ये बेस्ट प्लेअर ऑफ टूर्नामेंट रिया हेमके मायनींग विभागातील रजिस्टर बिसन सरच्या वतीने देण्यात आले, बेस्ट प्लेअर ऑफ मॅच मेकॅनिकल विभागाच्यातर्फ विध्यार्थीनि वेदांती पारितोषिक, ,बेस्ट बॅट्समॅन इलेट्रॉनिकस विभागाच्यातर्फ धनलक्ष्मी मेश्राम, बेस्ट बॉलऱ सिव्हिल विभागाच्यातर्फ चेतना गोहणे, बेस्ट फिल्डर इलेट्रिकल विभागाच्यातर्फ ऋतुजा बानकर ,बेस्ट कॅच संगणक विभागाच्यातर्फ आस्था झाडे, बेस्ट विकेट किपर ऑफिस विभागाच्यातर्फ मयुरी तोडे, ह्या विध्यार्थाना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
तसेच क्रीडा स्पर्धेचे भार टीम मॅनेजर म्हणून क्रीडा प्रमुख प्रा.कमलेश ठाकरे यांनी महत्वाची भूमिक पार पाडली, सूत्रसंचालन प्रा.नवशाद सिद्दकी यांनी केले तसेच सर्व विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांनी विधार्थीनीचा उत्साह वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले आणि कौतुक केले.