
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित सोमय्या पॉलिटेक्निक येथे मराठी राजभाषा दिवस आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आला. कवि वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला, यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. प्रीती आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य जमीर शेख सर, रजीस्टार श्री. राजेश बिसेन सर उपस्थीत होते. प्रास्तविकातून संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस. आंबटकर यानी मराठी भाषेचे महत्व सांगून कार्यक्रम आयोजन करण्यामागील भुमिका विशद केली. तसेच कवि कुसुमाग्रज ह्यांच्या कार्याविषयी महिती दिली, मराठी भाषेचा प्रसार व प्रचार कसा करायचा सोबतच मराठी भाषेकडे होणारे दुर्लक्ष यावर सविस्तर मार्गदर्शन केले. मराठी ही आपल्यासाठी केवल एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत, मराठी भाषा सामर्थ्यवान आणि सुंदर आहे. तसेच कवी विष्णु वामन शिरवाडकर हे आपल्या सर्वांचे लाडके कवी, लेखक, नाटककार, कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस होय, कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या कार्यक्रमाला उपस्थित विध्यार्थी ,सर्व विभाग प्रमुख, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थीत होते.