
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित दोन दिवसीय स्पर्श २०२२ वार्षिक स्नेह संमेलन, रॉक ब्रँड आणि डीजे नाईट सोमय्या पॉलीटेक्नीक येथे आयोजित करण्यात आले. प्रमुख पाहुणे पल्लवी काटकर मिस इंडिया स्टार २०२१, शुभम कोडापे बॉलिवूड डान्सर, वीरश्री खोब्रागडे मिस इंडिया तसेच सोमय्या पॉलीटेक्नीकचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, प्राचार्य राजदा सिद्धकी मॅडम ,रजिस्टर श्री.बिसन सर मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम दीपप्रज्वलन व सरस्वती मातेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, सोमय्या पॉलीटेक्नीकचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर यांनी विध्यार्थाना मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी प्रत्येक विभागातील अंतिम वर्षांतील विध्यार्थानि रॅम शो सादर केला.
मिस सोमय्या श्रुती लोखंडे संगणक विभागातील विधार्थीनि,मिस्टर सोमय्या आनंद त्रिपाठी इलेक्ट्रिकल विभागातुन यांनी पारितोषिक मिळविले. त्यानंतर रॅम शो मध्ये संगणक विभागातील विध्यार्थ्यानी पहिले क्रमांकांनी तर इलेक्ट्रिकल विभागातील विध्यार्थ्यानी दुसरा क्रमांक, मेकॅनिकल विभागाने तृतीय क्रमांक पटकावले, तसेच उत्कृष्ट विध्यार्थाना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.