
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आली, यामध्ये संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री.बिसेन सर यांची उपस्तित होते.
सर्वप्रथम श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले, विविध मान्यवरांचे भाषण आणि व्याख्याने झाली , तसेच संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती देत त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार शेतकऱ्यांचा भाजीच्या देठासही मन न दाखवणे, अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . परकीय आणि रावकीय अशा जुलमी सत्ताधीशाशी वतनदारांशी अनेक लढाया, युद्धे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जाती धर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार जीवाभावाचे मावळे एकत्र करून हा लढा दिला जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला आपल्या राज्यातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक भटकून ठोकून वट हुकूम काढले मराठी भाषेतून राज्यकारभार चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभाषा व्यवहार कोश तयार केला होता या ग्रंथामध्ये फारसी शब्दांच्या संदर्भासाठी संस्कृत शब्द दिलेले आहेत या ग्रंथाद्वारे महाराजांनी व्यवहाराचे मराठीकरण करण्याच्या प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत राष्ट्र निर्माता असलेल्या या महापुरुषांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे सहा जून १६७४ म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय हे रयतेचे राज्य शाश्वत चिरंतन राहावे म्हणून या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाला होता व शिवाजी महाराज छत्रपती झाले होते या दिवशी स्वराज्याचे स्वर व त्व दुर्ग रायगडाच्या राज सदरेवरून घोषित झाले याच दिवशी श्री शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती करून महाराज शककर्ते ही झाले तो हा सुदिन होय याच पवित्र दिवशी शिव काल गणनेला प्रारंभ झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिवस स्वराज यांची सर्व भूमी तत्वांची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.