
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या पॉलिटेक्निक येथे सावित्रीबाई फुले स्मृतिदिन पार पडला. याप्रसंगी संस्थापक पी. एस. आंबटकर, सचिव प्रीती पांडुरंग आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, अंकिता आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, रजिस्टार बिसन सर मंचावर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणात महत्त्वाचे योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले तसेच स्त्री शिक्षणाची महिती ओळखून शिक्षणाची दारे खुली करून दिली. 1896-97 मध्ये पुण्यात भयानक प्लेगची साथ पसरली. हा आजार अनेकांचा जीव घेऊ लागला. रुग्णाची सेवा करताना सावित्रीबाईंना ही प्लेग झाला आणि 10 मार्च 1997 रोजी त्यांचे निधन झाले. स्वतःची प्रकृतीची परवा न करता त्यांनी प्लेगच्या लागण झालेल्या रोगांची सेवा केली. शेवटच्या श्वासा पर्यंत समाजाची सेवाकेली. दलित बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमात सर्व शिक्षक वशिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.