महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे श्री. संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ. प्रीती पांडुरंगजी आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, रजिस्टर श्री. बिसेन सर उपस्तित होते.
या प्रसंगी संस्थचे संस्थपाक श्री. पी.एस आंबटकर यांनी श्री.संत जगनाडे महाराज यांच्या जीवन चरित्राबद्धल मार्गदर्शन केले, प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या श्री. संत जगनाडे महाराजांचे पटशिष्य असलेले संताजी महाराज यांचा जन्म चाकण, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव सोनावणे असून जगनाडे या टोपण नावाने ते जास्त प्रसिद्ध झाले. संताजी महाराज त्यावेळेचे संत हे संताजी महाराज त्यावेळेचे संत हे माळकरी, टाळकरी नसुन प्रस्थापित समाज व्यवस्थेवर वार करणारे खरे वारकरी होते. तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजींनी केले. संताजी महाराजांनी तैलीसिधु नावाच्या ग्रंथात व्यवसायाची माहिती दिलेली आहे. सतत वर्षा पर्यंत अविरत कार्य करणाऱ्या लढवय्या संताजीला तेली समाज म्हणूनच जन्तेलावर निस्वार्थ प्रेम करणारा आणि तुकाराम महाराज सारख्या माणसाला सर्व परिस्थितीत साथ देणारा दैवत मानतो असे विचार व्यक्त केले.
या प्रसंगी संस्थेचे सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.