
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक कॉलेज वडगाव येथे सोमय्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य सौ. शोभना मॅडम प्राचार्य, श्री.जमीर शेख सर, प्राचार्य श्री. फैय्याज सर, प्राचार्य श्री. रोशन सर, प्राचार्य श्री. हिवरे सर, प्राचार्य श्री पटले सर , रजिस्टर श्री.बिसन सर मंचावर उपस्तित होते.
श्री.पि.एस आंबटकर सर यांनी वडिलांच्या जीवनावर प्रकाश टाकत असताना आतमविश्वास,जिद्ध,चिकाटी,आणि परिश्रम करण्याची जिद्ध आत्मसात करून सोमय्या पुस्तकाची निर्मिती झाली, तसेच आपल्या कार्यप्रति समर्पणाची भावना असेल तर यश हे आपोआपच आपल्या जवळ चालत येते हे यशाचा मूलमंत्र सोमय्याजींनी आयुष्यभर जपला आणि त्यानुसार ते आपल्या जीवनाचा प्रवास करीत राहले ,तसेच त्यांच्या मूळमंत्रमूळे मी आज उंच शिखरावर पोहचलो आहे.
सर्व प्राचार्य गण आणि शिक्षक यांनी श्री.पि.एस आंबटकर सर यांचे अभिनंदन करीत,सोमय्या पुस्तकाचे शुभारंभ करण्यात आले .