
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सोमय्या पॉलीटेकनिकमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली ,यावेळी सर्व प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख, प्राचार्य रोशन रामटेके, प्राचार्य मनीष हिवरे, रजिस्टार श्री.बिसन सर उपस्तित होते.
यावेळी सौ. अंकिता आंबटकर यांनी समयोचित मार्गदर्शन करीत असताना, जगाला सत्याग्रहबरोबर अहिंसेचे तत्वज्ञान शिकविणाऱ्या गांधीजीचा जन्मदिवस जगभरात आंतराष्ट्रीय अहिंसादिन म्हणून साजरा केला जातो. अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला . जगाला सत्याग्रहबरोबर अहिंसेचे तत्वज्ञान शिकविणाऱ्या गांधीजीचा जन्मदिवस जगभरात आंतराष्ट्रीय अहिंसादिन साजरा केला जातो. अहिंसेचा तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजीनी ‘’ दांडी यात्रा’’ , ‘’भारत छोडो आंदोलन’’,”चले जाओ’’, मिठाचा सत्य ग्रह अशा चळवळ सत्य आणि अहिंसा या तत्वावर आधारित आंदोलनातं ब्रिटिश सरकारला धारेवर आणले,गांधीजींनी सदैव स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कंपन्यांचा विरोध करीत खादिचा पुरस्कार केला.
तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा जन्म दिवस साजरा केला ,”जय जवान ,जय किसान ” चा गुरु मंत्र दिला ,देशाचा आधार स्तंभ शेतकरी व सैनिक याना विशेष महत्व दिले असे सौ.अंकिता आंबटकर यांनी मोल्लावान मार्गदर्शन केले.
याकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्तित होते.