‘’ सर्व मांगल् मांगल्य मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते ||‘’
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेकनिक चंद्रपूर वडगाव , तसेच पैरामाऊंट स्कूलमध्ये बाबुपेठ नव रात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला, या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी. एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, सौ.अंकिता पियुष आंबटकर, , प्राचार्य शोभना मम् , प्राचार्य फैयाज अहंमंद ,प्राचार्य रोशन रामटेके, प्राचार्य जमीर शेख, प्राचार्य मनीष हिवरे, प्राचार्य फैयाज अहंमंद , प्राचार्य पटले सर , प्राचार्य दामले सर , रजिस्टर बिसन सर उपस्तित होते .
नव रात्रीचा सण म्हणजे नवरात्री असते, पैरामाऊंट स्कूलमध्ये अश्विन महिन्यातील पहिल्याच दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना तसेच घटस्थापना करण्यात येते तसेच नवरात्रीतील नऊ दिवस मोठया श्रद्धेने देवीची पूजा करतात,भजन कीर्तन केली जाते,नवरात्री नऊ दिवस देवीला वेगवेगळया रंगाचा साडया नेसवल्या जाते . सर्वांमध्ये आनंद उत्सव तसेच दांडिया,गरबा खेळतात, नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपाची पूजा करतात . देवीने राक्षस महिषासुराची वध केला म्हणून देवीला महिशासूरमर्दिनी असे सुद्धा म्हटले जाते. हा सण एकमेकाना जवळ आणतो आणि वाईट गोष्टीवर मत करून नवीन चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा हा सण आहे.
आपणही नवनवीन गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे .नवनिर्मिती केली पाहिजे व ती जोपासली पाहिजे असा संदेश संस्थेचे अध्यक्ष श्री.पी. एस.आंबटकर यांनी दिला .
या प्रसंगी संस्थेतील सर्व विभागातील विभाग शिक्षकेतर गण प्रमुख उपस्तित होते .