महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर,व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसंेबरला महापरिनिर्वाण दिवस करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिवाण दिनानिमित्य संस्थेतील प्राध्यापक व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ” प्राथमिक शिक्षण असे असावे की,यामध्ये वि़द्याथ्र्याच्या पुढील उच्च शिक्षणाची ती मुहूर्तमेढ ठरावी, पुढील जीवनात योणा-या अडचणीशी लढा देण्यासाठी सक्षम असे असावे, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश देवून शैक्षणिक जागृती केली “ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आधूनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते. असे विचार व्यक्त केले.
हया कार्यक्रमाकरीता MSPM गृपचे संचालक श्री. पि.एस.आंबटकर, उपसांचालक श्री. पियुष आंबटकर, तसेच रजिस्टार बिसन सर, प्राचार्य जमीर शेख सर, मॅकरून अॅकाडमीचे प्राचार्य श्री.रोशन रामटेके सर व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Read Time:1 Minute, 59 Second