सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेजची विधार्थीनी क्रीतिका शुक्ला हिने ऑल इंडिया मुक्केबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून क्रीडा स्पर्धेत संस्थेचे नाव मोठे केले, हि स्पर्धा राणी लक्ष्मीबाई पहिली मुली व महिलाची ऑल इंडिया बॉक्ससिंग टूरर्नामेंट भुसावळ २०२४ ला हि स्पर्धा छत्रपती साहू महाराज बॉक्सिंग अकॅडमि,फौंडेशन क्रिसोन स्पोर्ट्स अकॅडमि यांनी आयोजीत केली होती.
त्यामध्ये कृतिका शुक्ला हीचा राष्ट्रीय बॉक्ससिंग टूरर्नामेंट युवा स्पर्धा गटामध्ये ५७ किलो वजन गटात समावेश होता, संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांच्या हस्ते विधार्थीनीला मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले , तीने राष्ट्रीय स्तरीय मुक्केबाजी पदक मिळविला त्याबद्धल अभिनंदन केले तसेच विध्यार्थाना प्रोत्साहित करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते असे स्पष्ट केले,स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे.म्हणून शिक्षणासोबत इतर क्षेत्रसुद्धा निवडावे असे मार्गदर्शन इतर विध्यार्थाना केले.
विधार्थिनीने आपले मनोगत व्यक्त करीत आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष श्री. पी.एस.आंबटकर,उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पियुष आंबटकर, उपप्राचार्य श्री.जमीर शेख , प्रा.अनिल खुजे तसेच क्रीडा प्रमुख प्रा.धनश्री कोटकर आणि प्रा.कमलेश ठाकरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आणि नवी वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या, त्यांच्या या यशाबद्धल सर्वत्र कौतुक होत असून शिक्षक व शिक्षकेत्तरी कर्मचाऱ्यांना अभिनंदन केले.