जिल्हा प्रशासनासोबत कोविड विरुद्धच्या युद्धात सहभागी व्हा

0 0
Read Time:2 Minute, 25 Second

जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

चंद्रपूर, दि. 24 मे: कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना राबविल्या जात आहे. आता जिल्हा प्रशासना सोबत कोरोना विरुद्धच्या युद्धात जिल्ह्यातील 18 वर्षावरील नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

यांना होता येणार सहभागी:

जिल्ह्यातील डॉक्टर, प्रशिक्षित पॅरामेडिक, पॅलीएटीव्ह केअर, हॉस्पिटल मॅनेजमेंट एक्सपर्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, योगा ट्रेनर, डिजिटल कंटेंट क्रियेटर (ऍनिमेशन,मूवी मेकिंग), फिटनेस ट्रेनर, टेली कॉलिंग प्रोफेशनल, इव्हेंट मॅनेजर, सप्लाय चेन, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, वेअर हाऊसिंग, सायकॅट्रिक कौन्सिलिंग एक्सपर्ट, जनरल स्वयंसेवक, स्वयंपाकी इत्यादींना कोरोना विरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी सहभागी होऊ शकता.तसेच,मास्क, सॅनिटायजर आणि इतर पर्सनल सेफ्टी इक्विपमेंट तयार करण्यासाठी सुद्धा स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.

सहभागी होण्यासाठी संपर्क करा:

स्वयंसेवकांनी सहभागी होण्यासाठी chanda.nic.in या संकेतस्थळाला भेट देवून होम पेजवरील इन्डीवीजवल वालेन्टीअर या नावाचे चित्रावरील जॉइन नाऊ यावर क्लिक करा त्यानंतर गुगल फॉर्म उघडल्या जाईल. या गुगल फॉर्म वर सविस्तर माहीती भरा आणि फॉर्म सबमिट करा.या संबंधित काही अडचण असल्यास 9448258862 या क्रमांकावर तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या 07172-251597,272480 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post चंद्रपूर जिल्ह्यात 21 पॉझिटिव्ह रुग्ण
Next post निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांच्या हत्येने धक्का

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News