सोमय्या पॉलीटेक्नीक द्वारा स्पर्श २०२४ रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक स्पर्श २०२४ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर ,सचिव प्रीती पी.आंबटकर,प्राचार्य फैय्याज अहमद,प्राचार्य राजद सिद्दकी, प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य दीपक मस्के, प्राचार्य फैय्याज अहमद, प्रा.अनिल खुजे ,प्राचार्य राजकुमार, रोटरी क्लबचे श्री.अशोक हंसानी,श्री.भालचंद्र चांदे,मनीषा पडगेलवॉर, रजिस्ट्रार राजेश बिसन सर उपस्थित होते, सर्वप्रथम प्रमुख अतिथी हस्ते दीपप्रज्वलन करीत नटराजचा मूर्तीला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
सोमय्या पॉलीटेक्नीक विध्यार्थांचा समावेश ,सोमय्या आय टी.आय.विधार्थांचा सहभाग तसेच डीफार्म विधार्थांचा सहभाग नोंदविला होता. फॅशन शो,डान्स शो,रॅम वॉक,गायन स्पर्धा घेण्यात आले,तसेच उत्कृष्ट प्रथम आणि दुतिय क्रमांक विधार्थांचा सन्मान करण्यात आला.त्यामध्ये अर्पिता वांढरे,मग्न शोम,कार्तिक वावराडपे,शुभांषु जुमडे,श्रद्धा राऊत,इशिका लोहकरे,ह्या विध्यार्थाना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच सोलो डान्स शो मध्ये प्रथम प्रथम क्रमांक आद्यत्मिक मोरे मेकॅनिकल विभागातुन,शुभांगी पेरक इलेकट्रोनिकस आणि टेलीकॉम्युनिकेशन विभागातुन,तसेच इशिका लोहकरे सिविल विभागातुन तिसरा क्रमांक पटकाविला, तसेच ग्रुप डान्स संगणक विभागातून तिसरा क्रमांक,इलेकट्रोनिकस आणि टेलीकॉम्युनिकेशन विभागातून दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक संगणक विभागातून पटकावला. गायन स्पर्धा मध्ये खुशाल मंदाडे सिविल दुतिय वर्षातील विधार्थीप्रथम क्रमांक ,हर्षदा एखादे दुसरा क्रमांक ,राजकुमार कदम तृतीय क्रमांक पटकाविला.प्रथम वर्षातील विधार्थामधून मिस्टर सोमय्या अनि श सैय्यद ,मिस.सोमय्या पायल चिडे संगणक विभागातील विधार्थाना देण्यात आले.
प्रमुख पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठने काम केल्यास यश मिळते .स्पर्धा परीक्षाक्षेत्र शिगेला पोहोचली आहे. पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत ,अधिकारी बनल्यानंतर देश सेवा डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित विध्यार्थाना केले तसेच अन्य मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले.
तसेच त्यांनी विध्यार्थाना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व उज्वल भविष्यबद्धल शुभेच्या दिल्या, यशावर आणि प्रगतीवर प्रतिबिंबित करण्याची आणि भविष्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही संधी असते.शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. यशावर आणि प्रगतीवर प्रतिबिंबित करण्याची आणि भविष्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही संधी असते.शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होते. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, मनोबल वाढवण्यासाठी, समुदायाची भावना वाढवण्यासाठी आणि ध्येयाप्रती बांधिलकी मजबूत करण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन आहे. सूत्र संचालन प्रा.नवशाद सिद्धकी यांनी केले.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.