
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित वडगाव येथे MSPM गृपने भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ,या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, सौ. प्रीती आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुश आंबटकर, सौ प्रांजली रघाताटे,प्राचार्य शोभना मॅडम, प्राचार्य श्री. फैयाज सर, प्राचार्य श्री. जमीर शेख, प्राचार्य राजदा मॅडम, प्राचार्य श्री. जोगे सर, प्रा.मस्के सर, प्रा.राजकुमार सर, प्रा दामले सर, रजिस्ट्रार श्री. बिसन सर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वल करुन डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन च्या प्रतिमेला तसेच माँ भवानी, माँ सरस्वती माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली, शिक्षकदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि शिक्षक दिनाबद्दल मोलाचे मार्गदर्षन केले.
” शिक्षक-अपूर्णाला पूर्ण करणारा
शिक्षक शब्दानी ज्ञान वाढविनारा
शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा“
5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन प्रथमतः आई या गुरुला नंतर माझ्या वडील या गुरुना आणि ज्यांनी माझ भविष्य घडविले त्या तमाम शिक्षकाला , देवांना नमन, तसेच शिक्षक दिनानिमित्य शिक्षकाचा उत्साह स्पूर्ती वाढण्याकरिता दरवर्षी आयोजन करण्यात येते, तरी यावर्षी डॅन्स, गायन फॅनश शो अशे विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. विविध गु्रपमधील शिक्षकांनी आपली कला सादर केली.
” शिकवता शिकविता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ देनारे आदराचे स्थान म्हणजे शिक्षक…. शिक्षक विविध शाळा व कॉलेजाला प्रोत्साहन पद आणि पहिला दुसरा तिसरा क्रमांक देण्यात आला. तसेच उत्कृष्ट शिक्षक कार्याबद्दल प्रोत्साहनपर मानचिन्ह देण्यात आले.
गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मॅकरून कॉन्व्हेंट भद्रावती सुरज सर दुसरा क्रमांक परामौन्ट कॉन्व्हेट चंद्रपुर आणि तृतीय क्रमांक मॅकरून अकॅडमी वणी याना पारितोषिक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तसेच नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मॅकरून कॉन्व्हेंट भद्रावती पटकावला यांनी तसेच दुसरा क्रमांक मॅकरून स्टुडन्ट अकॅडमी व तृतीय क्रमांक सोमय्या पॉलिटेक्नीकचे कॉलेज वडगाव चंद्रपुर तसेच यांचा आला, तसेच फॅशन शो / रॅमवॉक मॅकरून कॉन्व्हेंट भद्रावती संस्थेतील पहिला क्रंमाक, दुसरा क्रंमाक परमॉन्ट कॉन्व्हेंट तृतीय मॅकरून कॉन्व्हेंट वणी यांनी पटकावला, आणी संस्थेतील शिक्षकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमा करीता सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
सुत्रसंचालन प्रा. नौषाद सर यांनी केले.