
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित मॅकरून स्टूडन्ट अकॅडमी येथे कृष्ण जन्माष्टमी दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्रा. राजकुमार सर, मंचावर उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विध्यार्थाना कृष्ण जन्माष्टमी उत्सवबद्दल माहिती देत असताना उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर म्हणाले या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून आपण हा श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो,गोविंद, बाळ गोपाळ, कान्हा, कन्हैया, गोपाळ, केशव, कृष्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाच्या जन्मसणाचा इतिहास, या सणाचे महत्त्व, हा सण आपण का साजरा करतो? याबाबतची सगळी माहिती त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण जयंती, म्हणजेच गोकुळाष्टमी.वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
तसेच विधार्थानी दहीहंडी फोडण्याची स्पर्धा सुरू असते,बालगोपाल विधार्थी कृष्ण आणि राधा बनून सर्वाना मनमोहीत करीत होते.
तसेच या कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी हरणे मॅडम ,प्रवीण सर ,अमित सर ,सुनील सर,क्रीडा प्रमुख सचिन सर ,शेंडे सर,अर्चना मॅडम , संगीता मॅडम,तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.